सह्याद्री शिक्षण संस्थेचे, सह्याद्री इन्स्टिटय़ुट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, सावर्डे येथे
जात पडताळणी एकदिवसीय शिबीर संपन्न.
महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, रत्नागिरी द्वारे शिबीर आयोजित केले होते .
बार्टी संस्था, पुणे शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत 'सामाजिक समता सप्ताह' भारताला स्वातंत्र्य प्राप्तीच्या ७५ व्या वर्धापन वर्षानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसेच महामानव, विश्वभूषण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त दि. ०६ एप्रिल ते दि. १४ एप्रिल २०२२ या कालावधीत सामाजिक समता सप्ताह निमित्ताने एकदिवसीय जात पडताळणी शिबीरा प्रसंगी समिती, अध्यक्ष सौ. ज्योत्स्ना पडियार त्याचबरोबर, शिवानी इंदुलकर (प्रोजेक्ट असिस्टंट), दर्शना आलीम (प्रोजेक्ट असिस्टंट) आणि विकास पाटील (स्टेनो) उपस्थित होते, सह्याद्री इन्स्टिटय़ुट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, सावर्डे च्या प्राचार्य डॉ. अश्विनी महाडिक यांनी उपस्थित अधिकारी यांचे स्वागत केले. यावेळी बी.एड. कॉलेज चे प्राचार्य. कांबळे उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थी - पालक, शिक्षक, कर्मचारी यांचे शंका निरसन केले.
अनु.जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रर्वगातील इतत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या तसेच तंत्रनिकेतन, महाविद्यालयातील विद्यार्थी-पालक यांच्याकरीता दि. ११.०४.२०२२ दुपारी ०३.०० ते ५.०० या वेळेस संपन्न झाले.
0 Comments